BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून कारटेप व मुद्देमाल
लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. यामध्ये २ जणांना अटक
करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. जगन्नाथ रामनाथ सरोज (46), दिनेश कश्यप
(33) असे चोरट्यांची नावे आहेत. हे टोळके कारमधील महागडे कारटेप काही हजारांत मुंबईच्या
चोर बाजारात विकत असते. पोलीस तपासात आतापर्यंत तब्बल 43 गुन्ह्याची उकल झाली आहे.
याप्रकरणी आरोपींना ठाणे न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती
पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
Post a comment