BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
भिवंडी-वाडा
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस
वाढ होत आहेत अपघातात अनेकांना आपला जीव
देखील गमवावा लागत आहे. दिवाळीच्या
दिवशी लक्ष्मीपूजन करण्यासाठी घरी जात असताना अशाच एका खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा
मृत्यू झाला.अंबाडी नाक्यावरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून
पडल्याने जखमी होऊन या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र डोंगरे (वय 42)
असं या दुर्दैवी व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने ऐन दिवाळीच्या दिवशीच डोंगरे
परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
Post a comment