0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बीड |
राष्ट्रवादीचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. शिवाय विजय मिळाला असला तरी पराभवही आपल्याच घरात झालाय, अशी खंत बोलून दाखवत धनंजय मुंडे भावूकही झाले. परळीत मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. 30 हजारापेक्षा जास्तीच्या फरकाने विजय मिळवणं ही साधी गोष्ट नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले.धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण-भावात परळीत काँटे की टक्कर होती. अखेर धनंजय मुंडेंची यात सरशी झाली. यावर धनंजय मुंडे म्हणाले, अटीतटीची नव्हे तर एकतर्फी लढत होती. एक्झिट पोलमध्ये परळी भाजपला दाखवली होती, पण आम्ही 30 हजार पेक्षा जास्त फरकाने जिंकतोय, त्यामुळे यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. मतदारसंघातील जनतेचे मनापासून आभार मानतो.

Post a comment

 
Top