0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
बघ्याची भुमिका घ्यायची असेल तर मुरबाड पोलिसांकडून घेतली पाहिजे कारण;मुरबाड तालुक्यात मशिनीमध्ये बनावट गुटखा विक्री होत असून त्यावर कान,डोळे झाकून झोपी गेल्याची भुमिका घेतांना दिसले आहेत.खालपासून वरील अधिकार्‍यापर्यंत गुटखा डिलरने हप्ते बांधले असून युवकांच्या बळीला पोलिस व तो गुटखा डिलर जबाबदार राहणार यात शंकाच नाहीच.गुटखा डिलर बनावट गुटखा मुरबाड तालुक्यात मशिनीमध्ये बनवत असून सर्रास त्याची विक्री करित आहेत याकडे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय खाकी वर्दीतला प्रशासक कोणत्यातरी गर्दीत लपत आहे.कारवार्इकडे पाठ फिरवत '' तुम करो हम तुम्हारे साथ है '' अशी भुमिका साकारत गुटखा डिलरशी संगणमत केले आहे.ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षीक यांकडे गांभिर्यतेने लक्ष घालत नसुन युवकांच्या मरणाला पोलिस यंत्रणा जबाबदार राहणार अशी चर्चा सध्या मुरबाडमध्ये होत आहे.गुटखा डिलर हाच खरा किलर वर कारवार्इ करून बनावट गुटखा बंद करा अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.डोळयातील उघडा गुटखा त्याचा युवकांना बसतोय फटका असा टोलाही नागरिक मारत असून त्या डिलरवर कारवार्इ करावी अन्यथा आंदोलन,मोर्चा काढण्यात येर्इल असा इशारा सामाजिक संघटनेंनी दिला आहे.

Post a comment

 
Top