0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – विरार |
विरारमधील कोपरी नित्यानंद नगर भागातील एक जुनी इमारत कोसळली आहे. येथील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. येथे 25 ते 30 वर्षे जुन्या चार मजली इमारती आहेत. यापैकी एका इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये एका चार वर्षांच्या मुलीच्या दुर्दैवी अंत झाला आहे. इमारतीत अनेक लोक अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दल, विरार पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी बचाव कार्य सुरू करत अनेकांचे प्राण वाचवले.विरार पूर्वेकडे कोपरी नित्यानंद नगरमधील एका इमारतीचा भाग मंगळवारी रात्री कोसळला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच तात्काळ बचावकार्यास सुरवात करण्यात आली. या इमारतीमध्ये सुमारे 30 ते 35 कुटुंबे राहत होती. या कुटुंबीयांना येथून बाहेर काढण्यात आले. मात्र एक चार वर्षाची मुलगी बेपत्ता होती. शोधकार्य सुरू असताना तिच्या अंगावर स्लॅबचा काही भाग कोसळल्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत अग्निशमन जवानांना दिसले. तिला बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र तिचे प्राण वाचवता आले नाही.

Post a comment

 
Top