0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
माळशेजघाटाच्या पायथ्याशी वसलेला ग्रामीण तालुका परंन्तु या तालुक्याला इतिहास सुध्दा आहे.आणि भुगोल सुध्दा त्यातुन निर्माण झालेला सामाजिक तत्वातुन राजकारण महाराष्ट्राच्या जडणघडणीत जावून बसला आहे.मुरबाड तालुक्याच्या राजकारणाला इतिहासाची साक्ष आहे.ग्रामीण मुरबाडच्या इंग्रजकालावधीत येथील स्वातंत्रसैनिकानी हुतात्मा पत्कारले देश स्वातंत्र झाला तदनंतर याचं गांवातील कै.नानाशंकरशेठ आणि नाना मोटारवाला (भुसारी) यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत.
मुरबाडच्या राजकारणात कै.शांताराम घोलप यांनी पे्रवेश केला आणि मुरबाडची काया पालट झाली राज्याचे महसुलमंत्रीपद भुषवताना त्यांनी शेती सिंचन रस्ते धरणे एमआयडीसी प्रशासकीय इमारती असा सार्वगिण विकास केला.त्यामुळेआज राज्यात मुरबाडच्या जडण घडणाची वाटचाल सुरू आहे.जशी मुंबर्इ नानाशंकर शेठ यांनी वसवली तसा मुरबाड तालुका कै.शांतारामभाऊ घोलप यांनी घडवला त्यांच्या नावाने आजही राजकारण चालतंय परंतु त्यांचा साधं चौकाला रस्त्याला नांव नाही पुतळा उभा राहात नाही ही शोकांतिका आहे.1995 ला महाराष्ट्रात युतीची पहिली सत्ता आली त्यावेळी माजी आमदार दिगंबर विशे न्यु इंग्लिश स्कुल शाळेत प्राध्यापक होते त्यांचा विजय झाला त्यावेळी महाराष्ट्रात सेना भाजपाची सत्ता आली त्यानंतर 2001 ला राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराम पवार निवडुण आले त्यावेळी राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता महाराष्ट्रात आली तदनंतर पुन्हा राष्ट्रवादी काँगे्रसचा आमदार मुरबाड मध्ये निवडुण आले महाराष्ट्रात सत्ता आली 2009 ला राष्ट्रवादीचे किसन कथोरे निवडुण आले तेव्हाही राष्ट्रवादीची सत्ता राज्यात आली आणि 2014 ला मुरबाड विधानसभेतुन किसन कथोरे भाजपा मधुन निवडुण आले राज्यात भाजपाची सत्ता आली मात्र येत्या निवडणुकीत भाजपाच्या जुन्या निष्ठावंतानी मागितलेली उमेदवारी केलेला विरोध माजी आमदार दिगंबर विशे यांचा झालेला विरोध घरच फिरल्या सारखे झाले दुसरीकडे ज्या भाजपाने राष्ट्रवादीतुन शिवसेनेत पळाला लावलेल्या पवार गटातील कार्यकर्ते तसेच सुभाष पवार यांच्या विरोधात दिलेला दुसर्‍या तालुक्यातील उमेदवार यांच्या आठवणी ताज्या असताना घराचे वासेही फिरतील काय ? असा कयास बांधला जात आहे.किसन कथोरे यांच्या विरोधात गोटीराम पवार वामन म्हात्रे असताना लढार्इ ठिक होती मात्र यावेळी राष्ट्रवादीतुन दानशुर निपक्षपाती सर्वजाती धर्माचा सहानभुती नेता प्रमोद हिंदुराव उभे आहेत.आज निवडणुकीच्या प्रवाहात प्रमोद हिंदुराव यांना राष्ट्रवादी म्हणुन प्रतिसाद मिळत नाही तर वास्तवादी सहानभुती आधार आज तेच उदया तेच परवा तसेच असे नेतृत्व असल्याने ही निवडणुक स्पर्धेची नाही मात्र विचाराची श्रृण फडेण्याची असल्याची मतदारात असणारी चर्चा मुरबाडच्या नागरिकानी घडयालाकडे मनसे पहाण्याचा मत रमवल्याचे चित्र पहाण्यास मिळत आहे.
            राजकारणात नाराजी आणि बंडाळी फार काही घडवून जाते.एकाच छताखाली प्रचाराची धुरा वाहतांना एकीकडे सुर तर दुसरीकडे धूर निघतो असाच प्रकार निवडनूकीच्या काही अंतरावर घडतांना दिसतो.मतदारात प्रशासनानी प्रचंड जागृती केली आहे.पैशांनी मते मिळतात असा शब्दप्रयोग काळाच्या पदद्दयाआड जात आहे.मात्र,ज्यांच्या हातात पैसा जातो त्यांचा प्रसाद शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचत नसल्याने घरासे वासे फिरलेले असतात.
            मुरबाड विधानसभा मतदार संगात युवकांचा प्रचारात असणार वेग आणि दुसरीकडे शेतकरी,व्यापारी,बेरोजगारांसह स्थानिक नागरिक समस्याग्रस्त जनता यांचा भाजपा युती सरकारावरील राग त्यातच स्थनिक लोकप्रतिनिधीवर नाराजी यामुळे राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांना आशा प्रलंबित झाल्या आहेत मात्र,निवडणूका जय परायजयाच्या असतात त्यातून काय ? घडेल हे सांगण्यासाठी थोडं थांबाव लागेल.
            मुरबाड विधानसभेत दोन्ही उमेदवारांनी सारा बदलापूर,कल्याण ग्रामीण,मुरबाड दर्‍याखोर्‍यां,वाडयापाडयात पिंजून काढला आहे.कुठे आशा कुठे निराशा आहे मात्र,ज्या पक्षाचा मुरबाड मधून आमदार त्याची राज्यात सत्ता हे नक्कीच.......

Post a comment

 
Top