0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शिवयोग प्रस्तुत - एस प्यारेलाल दिग्दर्शित "फक्त १२ तास " या मराठी सिनेमाचा प्रिमियर शो लालबाग -परेल येथील प्रसिद्ध सिनेमागृह " भारतमाता " येथे संपन्न झाला. या प्रसंगी या सिनेमातील प्रमुख अभिनेते शिव किकोड आणि लीना बी आणि ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून यांच्या सह रवी मोरे  (बडबडे), शिवाजी शिंदे , अण्णा हांडुरे , चेतन , हेमंत प्रसाद , धनराज सराटे , अक्षय यांच्या ही भूमिका आहेत.प्रमुख अतिथी म्हणुन दिग्दर्शक -पत्रकार महेश्वर तेटांबे , महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे मुंबई गटप्रमुख सचिन शिंदे , अभिनेता सुरेश डाळे, नृत्यदिग्दर्शक किरण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एकंदरीत "फक्त १२ तास" हा मराठी सिनेमा रहस्यमय असून उत्कंठावर्धक तर आहेच  शिवाय यातील सर्व कलावंतांच्या भूमिका तितक्याच दमदार ठरल्या असून त्यांच्या अभिनयाचा कस नक्की या सिनेमात पहायला मिळेल असे दिग्दर्शक एस प्यारेलाल यांचे म्हणणे आहे   


--------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a comment

 
Top