0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाडमध्ये मतदान केंद्राजवळ गाडया लांब ठेवण्यात यावे असे सांगण्यात आले होते परंतू त्याच परिसरात सध्या उमेदवार,पक्षाचे कार्यकर्ते यांनी आपली गाडी लावत मनमानी पध्दत सुृरू केल्याची चर्चा आहे.पोलिसांचा जागता पाहरा असताना पक्षाच्या कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्यावर निर्बंध लावण्यात का आले नाही असा प्रश्‍न सध्या मतदारांनी विचारला आहे.आमची गाडी मतदान केंद्राच्या आवारात लावण्यास मनार्इ केली जाते आणि येथे कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्यावर निर्बंध का लावण्यात येत नाही.निवडणूकी काळात जोख बंदोबस्त असताना मतदान केंद्राच्या 1 किमी परिसरात कोणत्याही गाडया लावण्यात येऊ नये,तात्काळ मुरबाड शहरातील सर्व मतदान केंद्राजवळील गाडया केंद्राच्या बाहेर काढण्यात याव्यात म्हणून मतदारांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 

Post a comment

 
Top