BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबर्इ |
ग्रेटर नोएडा येथे असणाऱ्या मित्रा सोसायटीमध्ये मंगळवारी सकाळी साडेआठ
वाजण्याच्या सुमारास एका लोककलाकाराची हत्या करण्यात आली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी
२५ वर्षीय सुषमाची हत्या केली. घटना घडल्यानंतर लगेचच सुषमाला जखमी अवस्थेतच नजीकच्या
कैलाश रुग्णालयात नेण्यात आलं होतं. सुषमा ही मित्रा सोसायटीमध्येच राहत होती, असं पोलिसांकडून
जारी करण्यात आलेल्या पत्रकामधून समजत आहे. या पत्रकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार,
जवळपास चार वर्षांपूर्वी सुषमाने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. ज्यानंतर सध्याच्या
घडीला ती येथे, गजेंद्र भाटी नामक एका व्यक्तीसोबत राहत होती. गौतम बुद्ध नगर येथील
वरिष्ठ पोलीस अधिक्षक, वैभव कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ ऑगस्टलासुद्धा सुषमावर
बुलंदशहर येथील मेहसाना गावात काही अज्ञातांनी हल्ला केला होता. ज्यानंतर त्यांच्या
नावे हत्येचा प्रयत्न करण्याच्या मुद्द्यावरून एफआयआर दाखल करण्यात आली होती.
Post a comment