BY -
युवा महाराष्ट्र लाइव - कोल्हापुर |
विधानसभा निवडणुकांच्या मतदानानंतर
कोल्हापुरात मोठा बॉम्ब साठा आढळला आहे. कोल्हापुरातील माले मूडशिंगी या गावात 69 गावठी
बॉम्ब सापडले आहेत. यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांकडून सविस्तर चौकशी सुरु आहे.
विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली
बॉम्ब स्फोट झाला होता. त्यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. तसंच विधानसभेच्या मतदानादिवशी
कोल्हापुरात बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती.यानंतर पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरु
केली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांना शिकारीसाठी
बॉम्ब वापरत असल्याची माहिती मिळाली.
Post a comment