0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – बदलापूर , ठाणे |
मुरबाड विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी विरूध्द भाजपा अशी रंगतदार होत असताना दसर्‍यांच्या मुहुर्तावर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांनी सकाळी साडे सहा वाजता रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला यावेळी भाजपाचे उमेदवार सामने आले असता त्या दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
          आपल्या प्रचार दौर्‍यात राष्ट्रवादी पुन्हा गाण्याने प्रचार घुमला.वेलवली सह बदलापूरात प्रमोद हिंदुराव यांनी कार्यकर्ते बैठका घेतल्या.यावेळी आपला वचनामा मोठया प्रमाणात महिला,युवकांच्या हातात पडल्याने प्रचारात रंगत भरली होती.
          प्र्थमच 10 वर्षानी मुरबाडचा राष्ट्रवादी उमेदवारानी बदलापूर मधील कार्यकर्ते,मतदारांशी संवाद साधल्याने यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा भाजपासमोर आवाहन उभे राहिलाचे बोलले जाते.भाजपाचे काही ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारी घोषित होण्यापुर्वी भाजपा उमेदवाराला विरोध दर्शविला होता त्यामुळे येत्या निवडणूकीत भाजपाचे कार्यकर्ते काय कमाल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
          निवडणूकीला थोडेच दिवस उरले आहेत त्या अनुशंगाने राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांनी बदलापूर,कल्याण,मुरबाड परिसर पिंजून काढला असून राजकारण व्यतिरिक्त जनतेच्य समस्या जाणून घेऊन सोडवण्याचे आश्‍वासन दिले तसेच त्या त्या भागातील मिडीयांशी संपर्क साधून आपली आणि आपल्या पक्षाची भुमिका स्पष्ट केली.मुरबाड विधानसभा मतदार संघात 8 उमेदवारी रिंगणात असूण त्यामध्ये खरी लढत भाजपा राष्ट्रवादीत आहे.
राष्ट्रवादीचा मुरबाड विधानसभा मतदार संघ बालेकिल्ला असून भाजपा सेना यांच्यातील अम्तर्गत असणारी मागील काळातील घुसफुस या निवडणूकीत बाहेर आल्यास तसेच शरदचंद्र पवार,अजितदादा पवार यांची जादू चालल्यास राष्ट्रवादी पुन्हा गाणं वाजू शकतं असे काय ? असा सवाल मतदार एकमेकांस विचारत आहेत.Post a comment

 
Top