0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पुण्यातील लॉजी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या  कंपनीमध्ये भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात इमारतीचे नुकसान झाले आहे. या कंपनीच्या टेरेसवर अनधिकृतपणे शेतीपंपासाठी लागणारी उपकरणे  तयार करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. ही उपकरणे 2014 पासून तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीमध्ये 15  कामगार काम करत होते. ही आग रात्री साडेअकराच्या सुमारास इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे लागली आहे.या आगीची माहिती स्थानिकांना मिळताचं दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीला आटोक्यात न येणारी आग उशिरा मोठ्या प्रयत्नाने विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. दरम्यान अरूंद रस्त्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत असल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे.
Post a comment

 
Top