0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
आज देशात विविध स्पर्धा होतात परंतु भारत ज्या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतो तेथे विजय हा निश्‍चितच होतो यात काही शंका नाहीच.महाराष्ट्राच्या मातीत अनेक क्रिडा क्षेत्रात नामवंत आणि जिद्दीने,चिकाटीने आपल्या मातीचे नावलौकिक करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आले आहेत आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत.त्यामध्ये क्रिकेट,हॉलीबॉल,कबड्डी,मॅरेथॉन यांचा समावेश असून कराटे हा महत्वपुर्ण स्पर्धेचाच भाग ठरला आहे.या स्पर्धेत स्वतःचेही रक्षण करायचे प्रशिक्षण दिले जाते व इतरांच्याही रक्षणाचे महत्वाचे स्टेप शिकवले जाते.अलिकडे ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील मास्टर वसंत जमदरे,ब्लॅकबेल्ट मास्टर मधूकर गायकर,बॉक्सींग मास्टर धीरज पाथारे यांनी कराटेच्या माध्यमातून शेकडो विद्दयार्थ्यांना स्वबळावर उभे करत कराटे स्पर्धेत सहभागी होऊन मानाचा मान प्राप्त करून दिला आहे.
दरवेळी विद्दयार्थ्यांचा वाढता ओघ कराटे स्पर्धेत नवचैतन्य निर्माण करून देणारे ठरले आहे.त्यामध्ये विजयी होऊन आलेल्या कराटे पट्टुंनी मुरबाडची शान राखली.वसंत जमदरे यांनी हार हा शब्द त्यांच्या विद्दयार्थ्यांना अजुनही शिकवला व दाखवला नाही यश ,जिद्द,निडर,शौर्यता,परखड,चिकाती याचे शिक्षण कराटे प्रशिक्षणासोबत दिल्यानंतर कोणता विद्दयार्थी मागे राहू शकत नसल्याने कराटे प्रशिक्षणाला विद्दयार्थ्यांचा प्रवेश घोग हा चालूच आहे.
कराटे मास्टर वसंत जमदरे,मधूकर गायकर,धीरज पाथारे यांच्यावर पालकांनी ठेवलेले विश्‍वास संपादन करताना आज आपण पाहता आहोत.पुन्हा झुंझ झालीच आणि ति ही नॅशनल लेवल मास्टर मेमेरियल 2019 च्या स्पर्धेत विद्दयार्थ्यांनी भाग घेतला आणि इतिहास घडवून आणला चक्क सर्व विद्दयार्थ्यांनी यश शिखर गाठत गोल्डमेडल,सिल्व्हरमेडल प्राप्त केले त्यांच्या या कलागुणांचे श्रेय मास्टर वसंत जमदरे,मधूकर गायकर,धीरज पाथारे यांच्या मेहनतीला बहाल केले असल्याचे विद्दयार्थी व पालकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.जे गेले खाली हात ते आले विजयाची घेऊन साथ अशा वाक्यात मधुकर गायकर यांनी विद्दयार्थ्यांना प्रोत्साहीत करित या स्पर्धेत मुरबाड,सरळगाव,किन्हवलीतील विद्दयार्थ्यांचे अभिनंदन केले.म्हणतात इतिहास घडतो परंतु मुरबाडच्या कराटे पट्टु इतिहास घडवतात हे या स्पर्धेतुन जगासमोर मुरबाडच्या कराटे विद्दयार्थ्यांनी दाखवून दिले आहे असेच म्हणावे लागेल.कारण सर्व विद्दयार्थ्यांनी गोल्डमेडल,सिल्व्हरमेडल मारले असुन हि साधी बाब नसून ऐतिहासिकच बाब आहे असे म्हणावे लागेल असे म्हणत मास्टर वसंत जमदरे यांनी विद्दयार्थ्यांच्या कुशलतेची वाहवाह केली आहे.
या मध्ये फाइट व काथा असे दोन भागाच्या स्पर्धेचा समावेश होता.यामध्ये हितेश शेलार(गोल्डमेडल), हर्षद जमदरे(गोल्डमेडल),माहर मैनक (गोल्डमेडल),रिया घोरड(गोल्डमेडल),मिताली नामदेव शेलार(गोल्डमेडल),साक्षी बांगर(गोल्डमेडल),कुमार टेकडे,कृपा घुडे(गोल्डमेडल),अमन मन्यार(गोल्डमेडल),जान्वी सादले(गोल्डमेडल),तन्वी गुणार्इ(गोल्डमेडल),किशन चौधरी(गोल्डमेडल),शुभम भाडगुळे(गोल्डमेडल),भार्गव डोंगरे(गोल्डमेडल),सिध्देश कोळेकर(गोल्डमेडल),श्रावणी केदार(गोल्डमेडल),प्रज्ञा रायकर(गोल्डमेडल),सिध्दांत वाढविंदे(सिल्व्हरमेडल),सोनाली चव्हाण(सिल्व्हरमेडल),शाहारूख पठाण(सिल्व्हरमेडल),हर्ष लाटे(गोल्डमेडल),कुशल साकेत(गोल्डमेडल),राजबाबु चव्हाण(गोल्डमेडल),सुरज गायकर(सिल्व्हरमेडल),मधुकर गायकर(गोल्डमेडल),केतन तिवारी(गोल्डमेडल),अजय लिहे(गोल्डमेडल),प्राची मोरे(गोल्डमेडल),प्रथमेश मोरे(गोल्डमेडल),प्रयेश शिंगोळे(सिल्व्हरमेडल),प्रिया भालेराव(सिल्व्हरमेडल),सायली कारोटे(गोल्डमेडल),ऋतुजा घोरड(सिल्व्हरमेडल),सोहम बांगर(गोल्डमेडल),इत्यादी विद्दयार्थी यशस्वी झाले असून त्यांच्या चेहर्‍यावरील मिळणार्‍या आनंदाचे पालकांनी मास्टर वसंत जमदरे,ब्लॅकबेल्ट मधुकर गायकर,बॉक्सींग मास्टर धीरज पाथारे,ड्रायगॉन इंडियन कराटे वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष लक्ष्मण घागस,ब्लॅकबेल्ट केतन तिवरे यांचे आभार मानले आहेत.

Post a comment

 
Top