0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक तसेच आर.पी.आय चे युवा नेते भगवान भालेराव यांचा उल्हासनगर शहरात झंझावती प्रचारदौरा सुरू केला आहे.
            शनिवारी भगवान भालेराव यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत पाचवा मैल वस्तीला भेट देऊन प्रचार केला.गेली 10 वर्षे भगवान भालेराव यांनी उल्हासनगर महापालिकेत सामान्य गोर गरिबांचे विविध समस्या माार्गी लावल्याने त्यांच्या चाहत्यांच्या अग्रखात्यार उल्हासनगर विधानसभा मतदार संघात आमदारकीची निवडणूक लढवत आहेत त्यांना युवकांची मिळण्याची साथ सर्व प्रचारात रंगत भरून घेत आहे.
            मुरबाड पासुन उल्हासनगर कल्याण परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने उलहासनर मधील भाजपा व राष्ट्रवादी उमेदवारासमोर भगवान भालेराव यांनी आव्हाण उभे केले आहे.शहरातील सामान्य नागरिक,व्यापारी अन्य घटकांच्या पाणी,आरोग्य,रस्ते,शिक्षण,रोजगार,घरकुल,संरक्षण अशा विविध समस्या सोडविण्यासाठी आपण विधानसभा निवडणूक लढवत असून प्रचारात माझा होत असलेला सन्मान हाच माझ्या उंच भरारीचा प्रवास असल्याचे त्यांच्या चाहत्यांकडून सांगण्यात येत आहे.
            उल्हासनगर शहरात पाचवा मैल वरप,कांबा,म्हारळ हृया ग्रामीण भागाचा समावेश असून शहारातील नगरवस्त्या यामधील समान्यांच्या घराघरात भगवान भालेराव यांचा प्रचार पोहोचल्याने निवडणुकीला रंगत भरली आहे.

Post a comment

 
Top