0
BY - युवा महाराष्ट्र लाइव |
पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ३० हून अधिक प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळ एक्स्प्रेसला आग लागल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटानंतर एक्स्प्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Post a comment

 
Top