0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेला होता दुगाडफाटा येथे झालेल्या या अपघातात डॉ. नेहा शेख या तरुणीच्या मृत्यूनंतर राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. सरकारने सुप्रीम कंपनीचे या महामार्गावरील अनगाव आणि वाघोटे येथील टोलनाके बंद करण्याचे आदेश दिले आहेत डॉ. नेहा शेखच्या मृत्यूनंतर नागरिकांनी सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं होतं. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने अखेर हे टोलनाके बंद केले, त्याशिवाय सुप्रीम कंपनीसोबत असलेला करारही रद्द करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी यांनी दिले. त्याचप्रमाणे ह्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेशही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.


Post a comment

 
Top