BY -
युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
विधानसभा निवडणुकांचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे.
यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाने संपूर्ण
महाराष्ट्राची मने जिंकली आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी कसलीच तमा न बाळगता त्यांनी
केलेल्या भाषणाची राज्यभरात चर्चा होत आहे. ही बातमी ताजी असतानाच आता त्यांचे
नातू रोहित पवार यांचीही अशीच बातमी समोर आली आहे. रोहित पवारांचे
भाषण सुरू असतानाही जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी पावसामुळे ते थांबले नाही.
त्यांनी भर पावसामध्ये भाषण तसेच सुरू ठेवले. रोहित पवार हे शरद पवारांच्या
पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत.शरद पवारांसोबतच रोहित पवार यांच्या या भाषणाचे
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्यांनी एकत्र या, मतदान करा. आपल्या
विचारांचा उमेदवार निवडून कसा येईल हे सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मला
खात्री आहे असं रोहित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले. तसेच यंदा 90 टक्के मतदान हे
राष्ट्रवादीला करा असेही ते या भाषणामध्ये सांगत आहेत.
Post a comment