0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी (Shivsena Legislative Assembly Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. युवासेनाप्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला शिवसेना आमदारांनी अनुमोदन दिलं. तर दिंडोशीचे आमदार सुनिल प्रभू हे शिवसेनेचे प्रतोद असतील. सेना भवनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाचे दिग्गज नेते आणि नवनिर्वाचित आमदार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर यासंदर्भात घोषणा करण्यात आली.शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांचीही नावं चर्चेत होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने ते शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम राहतील.

Post a comment

 
Top