0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
प्लॅस्टिकच्या वापराविरोधात संपूर्ण देशभरात अभियान सुरु आहे. २ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल यूज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले. प्लॅस्टिकच्या वापराने होणाऱ्या नुकसानाबाबत लोकांना जागरुक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आता बांबूपासून बॉटल्स तयार करण्यात आल्या आहेत. बांबूच्या या बॉटल खादी ग्रामोद्योग आयोगने तयार केल्या आहेत. बांबूच्या बॉटल प्लॅस्टिक बाटल्यांच्या जागी वापरल्या जाऊ शकतात. खादीच्या दुकानात या बॉटल्सची विक्री सुरु करण्यात येणार आहे. केंद्रिय रस्ते-वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बांबूच्या बॉटल्स लॉन्च केल्या. या बॉटल्स ७५० एमएल आणि १०० लीटरपर्यंत आहेत. या बॉटल्स किंमत ३०० रुपयांपासून सुरु होते. एक लीटर बॉटलची किंमत ५६० रुपये इतकी आहे.

Post a comment

 
Top