0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर |
शुक्रवार, दि. ४ ऑक्टोम्बर २०१९, वेळ :१५:०७ चिंचपाडा नितीन नामदेव म्हात्रे, रा. गावंदेवी मंदिराच्या बाजूला, चिंचपाडा गावं, कल्याण (पूर्व), जिल्हा - ठाणे यांच्या पडीत शेतात एक अनोळखी इसमाचा सांगाडा आढळून आला आहे. सदर मयत सांगड्याचे शेजारी असलेले कपडे व वस्तूचे वर्णन १) एका काळपट रंगाचा M size असलेला टी-शर्ट त्यावर समोरील बाजूस इंग्रजी अक्षरात एम्ब्रॉडरी ने लिहलेले TALWALKARS व पाठीमागे WHATS YOUR EXCUS इंगजी अक्षरात असलेले  टी-शर्ट २) एक काळपट रंगाची फुल ट्रॅक पॅन्ट ३) एक सिल्वर रंगाची हातातील अंगठी आढळून आले आहेत. ह्या अनोळखी व्यक्तीच्या डोक्याची कवटी, शरीराचा पूर्ण कुजलेला सांगाडा त्यावर मास गळलेला त्यामधील हाडे विखरून पडलेली व त्याच्या बाजूला एक रंग समजून येत नसलेला टी-शर्ट दिसून आल्याने यातील खबर देणार यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिलेल्या खबरी नुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून सदर अकस्मात मृत्यू बाबत आपणांस माहिती प्राप्त झाल्यास विठ्ठल वाडी पो.स्टे. क्रमांक.: 0251-25822009 अथवा सहा.पोलीस निरीक्षक ए. एस.सोनवणे मो. 09145453009 कळविणे.

सांगाडा कुणाचा?

पोलिसांच्या अंदाजानुसार हा सांगाडा एक महिन्यांपूर्वीचा असावा. शरीरातील हाडे फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार असून, डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. हा सांगाडा नेमका कुणाचा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सदर सांगाडावरील कपडे पहाता ते कपडे तळवळकर व्यायामशाळेचे अधिकृत कपडे आहेत. असे लक्षात आले आहे. असे पोलिसांनी सांगितले.Post a comment

 
Top