0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
लोकशाहीत मतदान पारदर्शक व्हावा मतदान झालेच पाहिजे असे सांगणार्‍या मुरबाड निवडणुक अधिकार्‍यांनी सामान्य गोरगरीब जनतेवरच तडफडण्याची वेळ आणली आहे.ज्यांच्यासाठी निवडणुका लढता त्यानाच वेठीस धरण्याचे काम निवडणुक अधिकार्‍यानी मुरबाड मध्ये केले असुन ग्रामीण रूग्णालयातील पोस्टमॅटम मलमपट्टी अन्य तातडीचे उपौचार करणारे कर्मचारी निवडणुक कामात जुंपले आहेत त्यामुळे येथील डॉक्टरानी निवडणुक आयोगाला रूग्णालयातील कर्मचारी निवडणुक कामात घेवु नका डॉक्टरानी जखमी रूग्ण उचलायाचे का? असा सवाल करून रूग्णांलयालाच टाळा लावतो असे सुचक इशारा दिला आहे.अत्यावश्यक सोयी अनेक बाबीतुन वगळल्या जातात मात्र विधानसभा निवडणुकीत मुरबाड मधील ग्रामीण रूग्णालयात काम करणारे कर्मचारी त्याच बरोबर ज्यांना रोजसरीवर काम करतात त्यांनाही निवडणुक कामात जुंपल्याने निवडणुका कोणासाठी गोरगरीब जनतेसाठी की नेत्यासाठी असा सवाल केला जात आहे.

Post a comment

 
Top