BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड / ठाणे |
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या पदोन्नत्ती बदलीसाठी
कोटी रूपये मोजावे लागतात.दुसरीकडे स्थानिक पालकमंत्री,आमदार,खासदार यांचे कार्यकर्ते
जोपासण्यासाठी ठेकेदारीसाठी कामाची वाटणी त्यातुन टक्केवारी विकास कामात होत असलेला
भ्रष्टाचार थांबल्यास देश आणि राज्याला अपयश आलं आहे.
ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1,विभाग क्र 2,विभाग क्र
3 अशा सर्वच विभागात निकृष्ट कामे करणार्या केदाराकडून अमाप टक्केवारी घेऊन बिले दिली
जात आहेत.टेस्टरिपोर्ट पासुन सगळंच खोटं,अपुरे रस्ते इस्टीमेंट प्रमाणे कामे न करता
काढण्यात येतात.बिले याकडे भाजपा सरकार दुर्लक्ष करत आहे.ग्रामीण भागात रस्ते खड्डेमय झाले आहेत.ठाणे सार्वजनिक बांधकाम
विभागाचे अधिक्षीक अभियंता,ठाणे कार्यकारी अभियंता,उपअभियंता,शाखा अभियंता हे टक्केवारी
घेऊन बिले काढतात.त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात बिले,इस्टीमेंट,टेंडर
तपासणीक,टेंडर ाोपन करणारे प्रथम टक्केवारी घेतल्या शिवाय बिले देत नाहीत या भ्रष्टाचारी
ठेकेदारीत भाजपा सेना राष्ट्रवादी सर्वच सामील असल्याने एकमेकांना सहाय्य करू,अवघे
करू मिळून भ्रष्टाचार अशी स्थिती धोकादायक बनली असून रस्ते,गटारी,संरक्षणभिंती सहपर्यटनाचे
कामे भ्रष्ताचारात मलीन झाली आहेत.पिव्हरब्लॉक नुसत्या ग्रिटवर टाकले जातात त्यावर
आमदार,खासदार निधी काढला जातो या विभागाची चौकशी केंद्र शासनाने करावी अशी मागणी ज्येष्ठ
पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.आम्ही वृत्तपत्र,चॅनेलवाल्यांना मॅनेज करतो,मार्चएंडींग
हप्ते देतो,जाहिराती देतो त्यामुळे मिडीया आमचं काहीही बिघडू शकत नाही असे शाखा अभियंता
पासून अधिकारी करत आहेत त्यातुनच आमच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वृत्तपत्रात चॅनेलवर
येत नाही असे ठणकावून अधिकारी सांगतात.
Post a comment