0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बीड |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळी येथील सभेचा बंदोबस्त आटोपून पोलिसांचे एक पथक पोलीस व्हॅनने बीडकडे परत जात असताना सिरसाळा परिसरात व्हॅन पलटी होवून अपघात घडला. या अपघातात चालक गंभीर जखमी असून 12 ते 15 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा परळीकडे येत होता. त्यांना अपघाताची माहिती कळताच तात्काळ स्वतः उतरून जावून जखमी पोलिस कर्मचार्‍यांना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्याची सोय केली.

Post a comment

 
Top