BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याबाबतचे
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
सप्टेंबर महिन्यात पावसाने पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात जोरदार तडाखा दिला. उत्तर
महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही पावसाने जोरदार तडाखा दिला. परतीच्या पावसाचा
फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात तातडीनं पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा
देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
Post a comment