0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
राज्यात होऊ घतलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती मधील अनेकांनी बंडखोरी केली आहे.दुसरीकडे सर्वच पक्षाच्या नेत्यासमोर मित्र पक्षांनी ताकदीचे उमेदवार दिले नसल्याने या वेळीची निवडणूक फिक्सींग तर नाही ना ? असा सवाल जानकरांकडून व्यक्त केला जातो त्यातच भाजपासेनेला सत्तेएवढया जागा निवडूण येणे कठीण झाले आहे.
            महाराष्ट्रात सत्तेची लाट असताना अनेक विधानसभा मतदार संघात सेना भाजपाच्या जागा घटण्याची शक्यता असून बहुमत सिध्द करण्याआधीच त्रिशंकु स्थिती समोर दिसत आहे.निवडणूकीपुर्वी अर्धे इधर अर्धे उधर बाकी मेरे पिछे चलो या प्रवाहाने राजकारणाची स्थिती बदलली असली तरी सर्वच पक्षाचे राजकारण प्रत्येक सामान्य सुज्ञ नागरिकांना समजले आहे.निवडणूका कोणी जिंकायाच्या,उमेवार्‍या कोणाला मिळतात,नेते खोटया आश्‍वासनाव्ची खेरात करतात.हाजारोंची उपस्थिती गप्प मनोरंजनात एैकून घेते हा बदलत्या राजकारणतील नांदी आहे.
            याचं राजकारण्यांनी मतदार कार्यकर्त्याला पैशाने निवडणूका जिंकता येतात आमदार घेता येतात,सत्तासिंहासन,घराणेशाही चालवता येते हाच प्रयोग नोटाबंदी नंतर त्यांच्याच अंगावर आल्याने त्यामध्ये अर्थे इधर अर्थे उधर अशी वाटणी करून पुन्हा राजकारणाच्या अर्थि करतात.समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय जाणकरांच्या मनात आहे.

            अशा इधर उधर च्य राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चक्क मला कणखर विरोधीपक्षाची संधी द्दया अशी मागणी केली तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता हातात मागतात.भाजपा मात्र,बहुमतांची भाषा करते अशा वातावरणात गतवर्षीपेक्षा निवडणूकाचा धुराळा मंदावाला आहे.सत्तेसाठी खोटारडेपणा सत्ता हातात द्दया हे करू ते करू मग एवढे दिवस काय करत होते तुम्ही असा तमाम मतदारांचा सवाल असुन विधानसभा प्रचाराद्वारे संपत्तीपेक्षा जास्त खर्चाने साजरे होत आहेत याबद्दल तर्कवितर्क काढले जात आहेत.

Post a comment

 
Top