BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात
गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण वार्षिक सभेला सुरुवात झालीय. सभेला सुरुवातीलाच भेत
गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या ठरावावरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांचे
दोन गट आमने-सामने आलेत. या सभेत राडा होण्याची शक्यता असल्यानं
अगोदरच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विशेष म्हणजे या
सभेच्या ठिकाणी असलेल्या खुर्च्यांना दोरखंडानं बांधण्यात आलंय. गोंधळाची शक्यता असल्यानेच
गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संघानं मल्टीस्टेटचा ठराव रद्द केल्याचा परिपत्रक
काढलं. पण जोपर्यंत सभेत ठराव रद्द करण्याचा ठराव होत नाही तोवर विरोधक स्वस्थ बसणार
नाहीत अशी भूमिका गोकुळ बचाव संघर्ष समितीने घेतली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षीची
वार्षिक सभाही याच मुद्यावरून गाजली होती. विधानसभा निवडणूक २०१९ मध्येही कोल्हापुरात
हाच मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता.
Post a comment