0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

जिल्ह्यात सध्या राजहंस तोफेची सर्वत्र चर्चा आहे . वन्यप्राण्यांच्या अनेकदा शेतात येऊन शेतीपिकांच प्रचंड नुकसान करतात.ते नुकसान सर्व शेतकऱ्यांना डोळ्यादेखत पाहावे लागते. अशावेळी हंसराज चव्हाण या शेतकऱ्याने जुगाड तंत्रज्ञानातून टाकाऊ प्लास्टिक पाईप आणि वस्तूपासून एका राजहंस तोफ निर्मिती केली आहे . कुठलाही प्रकारची मानव आणि वन्यप्राण्याला ईजा न होता या तोफेतून मोठा आवाज होतो आणि वन्यप्राणी शेताकडे फिरकत सुद्धा नाही असा हंसराज चव्हाण या शेतकऱ्याचा दावा आहे . त्यांची ही राजहंस तोफ त्याच शेतकऱ्याकडे जाणे झाले तेव्हा  मी सुद्धा चालवून पाहिली ही तोफ शिवाय त्याच शेतकऱ्याने फवारणी पंपा वर तूर कापणी यंत्र सुद्धा तयार केले आहे.

Post a comment

 
Top