BY -
युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नोबेल पुरस्कार
विजेते अभिजीत बॅनर्जी यांची भेट झाली. पीएम मोदी यांनी या बैठकीचे तेजस्वी वर्णन
केले आहे. पीएम मोदी यांनी ट्विट केले की अभिजीत बॅनर्जी यांची मानवी सक्षमीकरणाची
आवड स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय वंशाचे
अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक
जाहीर झाले आहे. जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिकस दृष्टीकोन या
विषयावरील संशोधनासाठी बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पत्नी एस्तेर डफ्लो आणि सहकारी
मायकेल क्रेमर यांनादेखील गौरविण्यात आले आहे.अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी भेटीचे छायाचित्र
ट्वीट करीत त्याविषयी माहिती दिली. नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत अतिशय
चांगली भेट झाली. मानवी सक्षमीकरणाबद्दलची त्यांची कळकळ स्पष्टपणे जाणवते. विविध
विषयांवर आमची अगदी सकारात्मक चर्चा झाली. संपूर्ण देशास त्यांच्या कर्तृत्वाचा
अभिमान आहे. त्यांच्या भावी प्रवासासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.
Post a comment