0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या देशातील सर्वात जुन्या मुद्दय़ावरील सुनावणी आता 17 ऑक्टोबरऐवजी 16 ऑक्टोबर रोजी पूर्ण होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय घेतला आहे. खंडपीठाचे अध्यक्ष असलेले सरन्यायाधीश बुधवारी हिंदू बाजूच्या सुनावणी दरम्यान म्हणाले की, या प्रकरणातील सुनावणीचा आज 39 वा दिवस आहे आणि उद्या 40 वा दिवस आहे. जो सुनावणीचा शेवटचा दिवस असेल. सरन्यायाधीशांच्या या घोषणेनंतर हालचाली वाढल्या आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 17 ऑक्टोबरपर्यंत या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. जेणेकरून निकाल लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.अयोध्या प्रकरणातील सुनावणीची ही शेवटची अवस्था आहे आणि सोमवारी मुस्लिम बाजूच्या युक्तिवादानंतर हिंदू बाजूचे युक्तिवाद आज सुनावणीस येत आहेत. आपली बाजू मांडताना हिंदू वकील परसरन यांनी कोर्टात असा दावा केला की बाबर आक्रमणकर्ता म्हणून भारतात आला आहे आणि बाहेरून आलेल्या कोणालाही मालकी मिळणार नाही.

Post a comment

 
Top