0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबर्इ |
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या वडिलांची सन्मानचिन्हे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ही चोरी दुसरी तिसरी कोणी केलेली नसून त्यांच्या घरातील नोकरानेच केल्याचं समोर आला आहे. नोकरानेच घरातील महागडी सन्मानचिन्हं भंगारात विकल्याची तक्रार सचिन पिळगावकर यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नोकरावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चित्रपट निर्माते होते. त्यांना अनेक उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी गौरवण्यात आलं होतं. त्याचीच ही सन्मानचिन्हे होती. सचिन पिळगावकरांनी वडिलांची आठवण म्हणून ही सर्व सन्मानचिन्हे घरात ठेवली होती. मात्र, घरातील नोकराने एक एक करुन ही सन्मानचिन्हे चोरली. आरोपी नोकराने अवघ्या 300 ते 400 रुपयांना ही सन्मानचिन्हे विकल्याचीही माहिती समोर आली आहे.

Post a comment

 
Top