0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |
देशाचे माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या पत्नीने त्यांची पेन्शन घेण्यास नकार दिला आहे. जेटलींची पत्नी संगिता जेटली यांनी राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून अरुण जेटली यांची पेन्शन राज्यसभेच्या त्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी ज्यांचा पगार कमी आहे, अशी विनंती केली. जेटलींच्या कुटुंबाला पेन्शन म्हणून जवळपास तीन लाख रुपये मिळणार आहे ज्या महान कार्याला अरुण जेटली करायचे, त्यांच्यांच मार्गावर चालत मी संसदेला विनंती करते की, एका स्वर्गीय खासदाराच्या कुटुंबाला मिळणारी पेन्शन त्या संस्थानच्या गरजू लोकांना दान करण्यात यावी ज्या संस्थानची जोटलींनी गेल्या दोन दशकांपासून सेवा केली. म्हणजेच राज्यसभेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी दिली जावी. मला विश्वास आहे की, अरुण यांचीही हिच इच्छा असती’, असं संगिता यांनी या पत्रात म्हटलं.

Post a comment

 
Top