0
BY- युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
'क्यार' चक्रीवादळामुळे रविवार दुपारपर्यंत समुद्र प्रचंड खवळलेला असणार आहे. त्यामुळे खोल समुद्रात जाणे टाळा असा इशारा तटरक्षक दलाने मच्छिमारांना दिला आहे. यासोबतच खोल समुद्रात अडकलेल्यांना सुखरूप किनारपट्टीवर आणण्यासाठी दलाने सर्व जहाजे व हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.क्यार चक्रीवादळाची सध्याची स्थिती गंभीर आहे. यामुळे तटरक्षक दलाकडून कोकण, गोव्यापासून कर्नाटकमधील कारवारपर्यंतच्या भागाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमधील अरबी समुद्राची स्थिती सध्या अत्यंत वाईट असणार आहे. 60 ते 80 किमी वेगाने सध्या वारे वाहू लागले आहे. यामुळे मच्छिमारांसह कोणीही समुद्रात जाऊ नये, असा धोक्याचा इशारा तटरक्षक दलाकडून देण्यात आला आहे. दलाचे पश्चिम क्षेत्र जनसंपर्क अधिकारी कमांडर आर. के. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मच्छिमारांना 20 तारखेपासूनच धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Post a comment

 
Top