0
BY - युवा महाराष्ट्र लाइव |
क्रिकेटविश्वात 'दादा' नावाने ओलखले जाणारे सौरव गांगुली आज बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र स्वीकारणार आहे. सौरव गांगुली बीसीसीआयचे 39 वे अध्यक्ष असतील. तसेच सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) होणार असल्याचं प्रशासक समितीचे सीईओ विनोद राय यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आज संपणार आहे. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात येईल.सौरव गांगुलीची निवड बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाली आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी विराजमान होणार आहे.

Post a comment

 
Top