BY -
युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |
आम्हाला हे मुख्यमंत्री नको, असं चॅनलच्या सर्व्हेमध्ये लोकांनी सांगितलं.
हे सरकार आणि मुख्यमंत्री बदलायला हवेत, असं आता लोकांना वाटत आहे.कारण या सरकारने
पाच वर्षात भाषणांशिवाय आणखी काहीही केलं नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या
खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या सरकारने फक्त
लोकांना फसवायचं काम केलं आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला नाशिकच्या येवला
येथे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली
होती. या सभेत सुप्रिया सुळे यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली
Post a comment