0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
मुंबईच्या आरे कॉलनीतील वृक्षतोडीला सुप्रिम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने सर्वोच्च न्यायालयात आरेतील वृक्षतोडीसंदर्भात हस्तक्षेप करण्याविषयी अर्ज दाखल केला होता. याविषयी सुप्रिम कोर्टात आज सुनावणी झाली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने राज्य सरकारला आरेतील वृक्षतोड थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.

Post a comment

 
Top