BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी
मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात बिगर काश्मिरी असलेले पाच मजूर ठार झाले आहेत.
तर इतर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ठार झालेले सर्वजण पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद
जिल्ह्यातील रहिवासी होते. युरोपियन युनियनच्या 27 जणांचे प्रतिनिधीमंडळ काश्मीरच्या
दौऱ्यावर आले आहे. याच वेळी हा दहशतवादी हल्ला झाला. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण
परिसराला वेढा दिला आहे. तर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. यासोबतच अतिरिक्त सुरक्षा
दलांनाही पाचारण करण्यात आले आहे.
Post a comment