![]() |
( राया खडवली रोड ज्यावर ज्यावर निधी काढला परंतू रस्ता झालाच नाही...) |
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे
अंतर्गत विविध रस्त्यांच्या,इमारती तसेच अन्य कामांमध्ये मोठया प्रमाणात घोळ करण्यात
आला असून भ्रष्टाचारात टक्केवारीचा सुर उमटला आहे.यामध्ये अधिकारी वर्ग महिला असो कि
पुरूष प्रत्येक कामात पैसे मोजावे लागत आहे.पैशाशिवाय बिल पास केला जात नाही.त्यासाठी
खालच्या टेबलापसून वरच्या अभियंता पर्यंत एका
कामामागे टक्के मोजावे लागत आहे.मागे मुरबाड मध्ये कर्जत,म्हसा रोड वर करोडो रूपयाचा
भ्रष्टाचार करण्यात आला होता त्याची इडी विभागामार्फत चौकशीही करण्याचे पत्र वरिष्ठांकडून
काढण्यात आले होते परंतू त्याची चौकशीही पैशाच्या साटेलोटेनी बंद करण्यात आली.तेव्हा
मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,यांना संबंधित अधिकार्यांची चौकशी करण्याची
विनंती करण्यात आली परंतू त्यावरही करण्याचे
आदेश आजतागायत देण्यात आले नाही.
![]() |
( पडघा आतकोली रस्त्याची दुर्दशा...) |
गुणनियंत्रणाचे भ्रष्टाचार करण्यात आलेल्या मुरबाड
म्हसा कर्जत रोडवर 42 ताशोरे मारले गेले त्यावेळीही त्या 42 ताशोरेंना गोणपाटीत बांधून
चौकशी दाबण्यात आली.ठाणे जिल्हयात भिवंडी,बदलापूर,अंबरनाथ,राया खडवली रस्ता त्याचबरोबर
मुरबाड तालुक्यात रस्त्यावर काम न करता बिले काढण्याचा महाप्रताप कारनामा अभियंता,कार्यकारी
अभियंता यांनी केला असता आत्ताच्या वेळी अचानक
बांधकाम विभाग ठाणे येथिल क्र.2 च्या कार्यालयास आग लागली परंतु ही आग लावली
की लावण्यात आली त्याचाही तपास सध्या गुलदस्त्यात आहे.कित्येक तक्रारी मंत्रालय येथे
पेंडीग असून अधिकारी वर्ग मंत्रालयीन नेत्यांना कारवार्इ न करण्यासाठी मॅनेज केले असल्याचेच
कळून येत आहे.महाराष्ट्र शासन या अधिकार्यांना पगार देतो खरे पण भ्रष्टाचारी किडा
हा संपेना.त्यामुळे अशा अधिकार्यांच्या व
निकृष्ट कामाविरोधात तक्रार करण्यात येते तक्रारीची चौकशी केली जात नाही म्हणून उपोषणे,आंदोलने
करण्यात आले तरी कारवार्इ शुन्यच राहिली आहे.
![]() |
( याच मुरबाड-म्हसा-कर्जत रोड वर करोडो रूपयाचा भ्रष्टाचार झाला आहे कारवार्इ मात्र शुन्य...) |
शहापूर रस्ता आजही तसाच आहे टेंडर काढले
जातात परंतू त्यावर कामे केली जात नाही.एका वर्क ऑर्डरवर 15 हजार रूपये घेतले जाते,कार्यकारी
अभियंता 2 टक्के तर उपअभियंता हा टक्केचा भागीदारी
झाला आहे.मार्च ऐंडिगला बोगस कामांवर निधी काढला जात असून मंञ्यापासून खालपर्यंत सगळयांना
टक्केवारी पाहोचवली जाते.सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांचे जिवावर तर काही निवडणूका
लढविल्या जातात असे नागरिकांनी म्हंटले आहे.प्रत्येक ठेकेदार हा टेंडर पासून ते बिल
बनवणे ते वर्क ऑर्डर बनविण्यापर्यंत नोटांची गड्डी समोर ठेवतो आणि बिलावेळी टक्केवारी बोगस कामांवर कार्यकारी अभियंता सही करतो.माहिती
अधिकारांत माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.या अधिकार्यांना कोणताही भय
नाही कारण यांच्या पाठिशी नेत्यांपासून लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद आहे त्यामुळे " हम करे
सो भ्रष्टाचार " अशा पध्दतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता बादशाहा
म्हणून वागू लागला आहे.करोडो रूपयाचे टेंडर विना ऑनलार्इनने काढले जातात त्याला म्हंटले जाते.या ऑफलाइन मध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार
अधिकारी,ठेकेदार वर्ग करत आला आहे त्यामुळे चौकशी करण्याची मागणी केली असतानाही तक्रारीला
दुजोरा दिला जात आहे.
![]() |
( मुरबाड सासणे रोडवर निकृष्ट कामावर खड्डे ; कार्यकारी अभियंतानी कधी पाहणी केलीच नाही म्हणे पाहणी केल्याशिवाय बिल निघणार नाही मग या रोडवर बिल कसे निघाले...) |
शासनाने दुर्लक्ष केल्याने अधिकार्यांनी टक्केवारीवर झोड उचलली
असून 3 लाखाच्या टेंडर पासून करोडो रूपयाच्या कामावरील टेंडवर 2 ते 3 टक्के घेतले जातात
हा भ्रष्टाचार न थांबवल्यास भ्रष्टाचार जार्इल
आणि वेळेवर आवर घालणे नंतर शासनालाही जड जार्इल.( भाग- 1, क्रमशः उर्वरित उद्दयाच्या
भागात... )
Post a comment