web-ads-yml-728x90

Breaking News

गोरखगडावर साजरा झाला दिपोत्सव..

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपुर्ण महाराष्ट्र उजळवून टाकला. परंतु त्याच महाराष्ट्रात महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले मात्र अंधारात असतात. हे किल्ले प्रकाशमान व्हावेत त्यांची ओळख निर्माण होउन स्थानिक ट्रेकर्स ना रोजगार मिळावा या हेतूने तालुक्यातील गोरखगड किल्ल्यांवर ट्रेकर्स असोसिएशन तर्फे पहाटे दिपोत्सव पार पडला.
ठाणे जिल्हा ट्रेकर्स असोसिएशन माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या पहाटे दिपोत्सव आयोजित करण्यात आला होता यंदा ह्या उपक्रमाचे ०२ रे वर्ष होते. परिसरातील ३० ट्रेकर्स कार्यक्रमात सहभागी झाले होते. २५० पणत्याच्या साह्याने गोरखगड उजळवून निघाला. या कार्यक्रमासाठी असोसिएशन चे अध्यक्ष चेतनसिंह पवार, सचिव विनोद आघाणे, अनिल चिराटे व नानु चिराटे उपस्थित होते.

No comments