0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं  आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय  मिळवला आहे. त्यांना 86233 मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80665 मते मिळाली आहेत.मनसेने इतर पक्षांच्या तुलनेत काहीशी उशिराने विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. सुरुवातीला मनसे निवडणूक लढणार की नाही याबद्दल संभ्रम होता. मात्र, त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी समोर येत भूमिका स्पष्ट केली आणि निवडणूक लढण्याची घोषणा केली. राज ठाकरेंनी राज्यभरात मोजक्या ठिकाणी सभा घेत मनसेला राज्यातील सक्षम विरोधीपक्ष बनण्यासाठी जनमत मागितले. मात्र, या निकालात त्यांना दुपारपर्यंत खातंही खोलता आलं नव्हतं. अखेर कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील यांनी मनसेचं खातं उघडलं.

Post a Comment

 
Top