0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – बदलापूर |
बदलापूरातील मते आमच्या विचाराची हा खोडकिडा काढून टाकण्याचे काम 10 वर्षांनी राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांनी काढून टाकलीय.बदलापूरात राष्ट्रवादी कार्यकर्ता आक्रमक झालेच मात्र,त्यांच्या सोबत सर्व जातीधर्माचे लोक प्रमोद हिंदुराव यांच्या प्रचारात सामील झाल्याचे पाहण्यास मिळाले.
            बदलापूर,मुरबाडमध्ये विलीन झाले त्यावेळी किसन कथोरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि माजी आमदार गोटीराम पवार अपक्ष लढले त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये किसन कथोरे गेले त्यावेळी गोटीराम पवार भाजपाचे किसन कथोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी म्हणून लढले या दोन्ही निवडणूकीत बदलापूर मध्ये गोटीराम पवारांना 9 ते 10 हजार मते मिळाली शिवाय ही मते वांगणी ग्रामीण परिसरातील होती.शहरी करणाची मते नव्हती त्यांचाच फायदा किसन कथोरे यांना झाला म्हणून गोटीराम पवार पराभूत झाले.
            आजच्या निवडणुकीची स्थिती गंभीर आहे. आज बदलापूरात प्रमोद हिंदुराव यांचा झंझावत आहे.ज्या आशिष दामले यांना 10 हजार मते पडायची त्यामुळे गोटीराम पवार पराभूत होत तेच दामले दमले.प्रमोद हिंदुराव यांच्या सोबत आले आज त्यांची 20 हजार 20 हजार मते राष्ट्रवादीला मिळतील शिवाय सर्व जातीधर्माची अन्य नाराज जनाची मते मोठया प्रमाणात प्रमोद हिंदुराव 1 लाख 10 हजार मतांनी निवडूण येऊ असे प्रचार सभात सांगतात हे वास्तव खरे आहे.
अर्ज दाखल केला त्यावेळी अजितदादा पवार आले त्याच स्टेजवर 90 हजार मतांनी निवडून येऊ सांगणारे हिंदुराव आता 1 लाख 10 हजाराची आरोळी ठोकतात अशा विजयासाठी आक्रमक प्रचार बदलापूर,कल्याण,मुरबाडमध्ये सुरू असल्याने भाजपाने कोणताही कार्ड काढला तरी राष्ट्रवादीचा घडयाळ अचुक टायमिंग साधून जाण्याची चर्चा मतदारांत आहे.मतदार शांत आहे.मतदार शांत आहे ज्यांनी सामान्यांचा रेशनिंग कार्ड काढून दिला नाही तोच कार्यकर्ता जोरात आहे.

Post a comment

 
Top