0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी  |
गेले 20 वर्षापासून आतकोली तलाठी चिराडपाडा वाशेरे पठारावर शासकीय महसुल जागेत हजारकोटी रूपयाची रायल्टी चोरी,माती,दगडखाणी उत्खनाने झाली असून शासकीय भुखंड,मालमत्ता,गौणखनिज यामध्ये एक हजार कोटीचा भ्रष्टाचार करणार्‍या तात्काळी तलाठी सर्कल तहसिलदार जिल्हाधिकारी यांच्यापासून आजपर्यंतच्या अधिकार्‍यांपर्यंतर्इडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी येथिल शेतकर्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
शासनाचा भुखंड लीज भाडपट्टावर दिल्याचे दाखवून संबंधित अधिकारी,गौणखनिज खदाणी मालकांनी शासनाचा हजारो कोटीचा नुकसान केला असून अमाप संपत्ती जमा केली आहे.येथील गोडावूनच्या सपाटी करणासाठी अवैध माती उत्खनन बांधकामे केली असून लाखो रूपयाचे हप्ते संबंधित अधिकारी घेत आहेत.


Post a comment

 
Top