0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
चंद्रपुर जिल्हयातील गडचांदुर या गावी दि.16/10/2019 रोजी राजकीय पक्षाचे स्टिकर संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला लावून विंटबना करण्यात आली.संत रोहिदास महाराज हे कोणत्या एका समाजाचे नसून ते महाराष्ट्रातील विविध घटकांच्या समाजाचे महापुरूष आहेत अशा यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बांधवांनी याचा जाहिर निषेध व्यक्त केला आहे.
या प्रकरणामुळे सर्व चर्मकार बांधवांबरोबर संत रोहिदास महाराजांना माणनार्‍या प्रत्येक नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत त्या घटनेचा प्रडसाद ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात चर्मकार बांधवांबरोबर विविध समाजातील नागरिकांवर पडला असून या घटनेचा तीव्र निषेध करत ज्या समाजकंटकाने सदरचे कृत्य केले त्याचा शोध घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवार्इ करण्यात यावी,त्या समाजकंटकाचा आम्ही निषेध व्यक्त करतो असे निषेध पत्र संत रोहिदास वाडा येथिल संत शिरोमणी रोहिदास महाराज (चर्मकार समाज)यांचे वतीने मुरबाड तहसिलदार यांना आज देण्यात आले.यावेळी मोठया संख्येने चर्मकार बांधव व संत रोहिदास महाराज यांना माणनारे सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

Post a comment

 
Top