0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – तिरुचिरापल्ली |
तमिळनाडूतील (Tamil Nadu) तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli)जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी दोन वर्षांचा बोअरवेलमध्ये मुलगा पडल्याची घटना घडली. शुक्रवारपासून एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दलाकडून मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुजीत विलसन नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. पडल्यावर तो ३० फुटांवर अडकला. पण नंतर मुलगा आणखी खाली जात जवळपास १०० फुटांवर अडकला आहे. बोअरवेल निकामी झाल्यानंतर ते तसंच खुलं ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.

Post a comment

 
Top