0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी आता एसटी सज्ज झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या आगारांमधून दिवसाला जवळपास 359 जादा बस सोडण्यात येणार आहेत. 24 ऑक्‍टोबर ते पाच नोव्हेंबर या दहा दिवसांत 3,500 जादा बस प्रवाशांच्या सेवेत असणार आहेत.
दिवाळी आली की, आपल्या गावी जाण्याची लगबग सुरू होते. लहानग्यांना सुट्ट्या लागलेल्या असतात. त्यांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागतात. दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यामुळे एसटी महामंडळाने जादा बस सेवेचे नियोजन केले आहे. त्यासाठी विभागनिहाय जास्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. एसटीने जादा बसच्या आरक्षणाची सुविधा प्रत्येक आगार, स्थानके, संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपवरून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Post a comment

 
Top