0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – उत्तर प्रदेश |
उत्तर प्रदेशमधील मौ येथे सोमवारी एक अतिशय वेदनादायक अपघात झाला आहे. मौ, मोहम्मदाबाद येथील एका घरात सिलेंडरच्या स्फोटानंतर दुमजली इमारत कोसळली असून 10 लोक ठार तर अनेक जखमी झाले आहेत. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि पोलिसांना कळविल्यानंतर लोकांनी मदत व बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटात काही लोक जखमी झाले आहेत, तर काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a comment

 
Top