0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात वेगवान हालचाली पाहायला मिलत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सस्तास्थापनेसाठी संघर्ष सुरू आहे. दरम्यान आज भाजपची बैठक होत आहे.आज विधिमंडळ नेत्यांची होणार निवड, सर्वच पक्षांच्या बैठका होणार महत्त्वाचे म्हणजे आजच भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही मुंबईमध्ये दाखल होत आहेत. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्याही बैठका आज आहेत. हे पक्ष आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करणार आहेत. विधिमंडळ नेत्यांच्या निवडीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे.युतीमध्ये सध्या विविध घडामोडी घडताना दिसत आहे. या नव्याने होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली रणनीतीही ठरवू शकते. या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असे मानले जात आहे. तर शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे.

Post a comment

 
Top