0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड , ठाणे |
मुरबाड तालुक्यातील सिद्धगड किल्ल्यावरील दिंडी दरवाज्याला तोरण बांधुन किल्ल्यांवर दसरा साजरा करण्याचा अनोखा उपक्रम मुरबाडकर ट्रेकर्स परिवाराने राबवला. दसऱ्याच्या दिवशी वापरात असणाऱ्या साहित्याची अवजारांची पुजा करण्याची परंपरा आहे. 
त्याचप्रमाणे गडकिल्ले सुळके चढण्यासाठी वापरात येणाऱ्या प्रस्तरारोहण साहित्याचे गडाच्या  पायथ्याशी असलेल्या नारमातेच्या मंदिरात पुजा करण्यात आली. गडावर एकमेव तोफ असुन. त्या तोफेचे पुजन करण्यात आले. गडदेवता नारमातेची सामुहिक आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली. तर सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड च्या शिलेदारांनी गतवर्षी बसवलेल्या गोरखगड येथिल दरवाजा सुशोभित करून दसरा साजरा करण्यात आला..

Post a comment

 
Top