0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड विधानसभा मतदार संघात 3 लाख 20 हजार मतदार गेल्या2014 च्या निवडणूकीत होते त्यावेळी भाजपाला 85 हजार सेनेला 69 हजार आणि राष्ट्रवादीला 72 हजाराच्या आसपास मते पडली होती यामध्ये भाजपा 15 हजाराने विजयी झाली होती.
          निवडणूकीनंतर मतदार संघात बोगस मतदानाची आकडेवारी चर्चेत आली त्यांची चौकशी झाली त्यावेळी 42 हजार मतदार बोगस निघाले सदर मते कोणाची होती याचं गुपीत पुढे उलघडले नाहीच.पाच वर्षे गेली पुन्हा निवडणूका आल्या नविन मतदारांच्या नोंदण्या झाल्या आणि मुरबाड मतदार संगाची मतदार संख्या 3 लाख 60 हजाराच्या आसपास गेली मात्र,त्यातील किती मतदार गांवे शहरे सोडून गेली,किती मृत्यु मुखी पडले,किती बोगस नावे यांचा उलगडा लोकसभेला झालाच ना ?
          भिवंडी लोकसभा मतदार संघात मुरबाड विधानसभा मतदार संघत पुर्णता येतो येथे भाजपाची सत्ता आहे परंतू लोकसभा मतदान वेळी यांच कार्यकर्ते नगरसेवक,जिल्हापरिषद,पंचायत समिती सदस्य कार्यकर्त्यांनी असाच प्रचार केला होता हेच विधानसभेचा प्रचार करतात परंतू लोकसभेला भाजपाच्या उमेदवाराला 1लाख 10 हजार मते पडली होती,काँग्रेसच्या उमेदवाराला 70 हजाराच्या आसपास मते पडली एकूण मतदान 1 लाख 80 हजार झालं.मुरबाड विधानसभेचे मतदान 60 टक्के झाले होते त्यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला पडलेली मते केवळ भाजपाची नव्हती तर त्यांच्या चाहत्यांची होती हे विसरून चालणार नाही.

          परंतु विधानसभेत भाजपा म्हणजे 3 लाखाच्यावर मते मिळतील विरोधकांची डिपॉझिट जप्त होर्इल मग लोकसभेला हाीच मते कुठे गेली होती याची आठवण केली पाहिजे.दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणतात 1 लाखाच्यावर मतांशी निवडणून येणार मगर चार लाख मते कुठून आली की येणार हा चर्चेचा विषय बनला आहे.दुसरीकडे बदल हवा का ? बदला हवा अशा रंगतदार मुरबाडच्या निवडणूकीकडे पाहिलं जात आहे.एकीकडे भाजपकडून पाच वर्षे शिवसैनिकांना झालेल्या वेदना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना पळो की सळो करून ठेवलेली आठवण त्यातच दोन वेळा गोटीराम पवारांचा दोन वेळा झालेला दाटून पराभव तसेच भाजपाच्या नगरपंचायत अवैध बांधकामे ठेकेदाराची एकेरीसाठी प्रशासनावरील नाराजी आणि पत्रकारांपासून सामाजिक कार्यकर्ते,नागरिक यांना प्रत्येक कार्यक्रमापासून लांब ठेवलेले भाजप पक्षीय राजकरण याची नाराजी आग तर दिसत नाही ना असा सामना रंगला आहे.

Post a comment

 
Top