0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे,यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
दरम्यान शनिवारी झालेल्या छाननीअंती 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नंदूरबार जिल्ह्यात 4मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात 5मतदारसंघात 38 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 100 उमेदवार,बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 59 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात68 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात8 मतदारसंघात 109 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार,नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 146 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात42 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात3 मतदारसंघात 38 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 71 उमेदवार,यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 88 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात135उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तर, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 33 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4मतदारसंघात 53 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 79 उमेदवार,औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 128 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15मतदारसंघात 148 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 53 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 214 उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघात244 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 89 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 78 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 246उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 116 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6मतदारसंघात 115 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 79, उमेदवार,उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 50 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11मतदारसंघात 154 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 73 उमेदवार,रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 32 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात23 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 106 उमेदवार, सांगली जिल्ह्यात8 मतदारसंघात 68 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.


Post a comment

 
Top