BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या
कालावधीत जेव्हा गोटीराम पवार यांचा तिकीट कापलं गेलं.किसन कथोरे यांना उमेदवारी दिली
गेली त्या पहिल्या निवडणूकीत तुम्हाला बदल
हवा की नाय अशा प्रचाराने बदल पुढे झाला,भ्रष्टाचार मुक्त डांबरमुक्त ठेकेदारी मुक्त
घोषणा झाल्या.राष्ट्रवादीचा विजय झाला आणि निवडणूकीपुर्वीची बदलात माणसं बदलली,ठेकेदारी
रेशनिंग सर्वच भाजपात गेले आणि त्यावर पडदा पडला.
पाच वर्षे सुखाचा संसार चालला पुन्हा निवडणूका आल्या.आमने सामने
तेच चेहरे आले आणि भाजपाचं घोषवाक्य बदल एैवजी विकासाला मत दया आलं त्या पांच वर्षात
प्रत्येकाची नाळ हातात भेटली जेथे आड आला त्याला बडवल विकास जिकडे तिकडे गाजू लागलं
वारे वाहू लागले मात्र मनमानी प्रशासन भ्रष्टाचार,रेशनिंगधान्य काळाबाजार,पाणी टंचार्इ,बेरोजगारी,आरोग्य,अवैध बांधकामे,बोगस सार्वजनिक बांधकाम विभागाची बोगस कामे यावर कारवार्इ
झाली नाही
प्रत्येक जण त्यांच्या विकासाला शोधू लागला कुठे इमारतीत कुठे रस्त्यात कुठे
पर्यटनस्थळात कुठे बाजारात कुठे माळशेजघाटात विकास दिसला असे सांगू लागले मात्र विकास
अकल्पनेत राहिला. त्यांना विकास झाला मात्र त्यांची ओळख यांना पटलीच नाही हे म्हणत
होते तो विकास नव्हेच यातच पाच वर्षे गेली नगरपंचायतीच्या अवैध बांधकाम नगरपंचायत सिओ
निलंबित झाला.
तहसिलदार,सार्वजनिक बांधकाम,पंचायत समिती,वनविभाग,कृषी,एमएसर्इबी,पाठबंधारे
अशा सर्वच विभागात प्रचंड भ्रष्टाचार मात्र त्याकडे विरोधी पक्षानी ढुंकुन पाहिले नाही
यातच विकास चिनच्या धर्तीवर गेला आणि आता भाजपाचा विक्रम आला आहे.आम्हाला विक्रम करायाचा
आहे म्हणे तो सुध्दा मतदानाचा सारे तुमचचं आहे मग विक्रम कशाला हवा विक्रम झालाच की
ज्यांना विकास शोधता आला नाही त्यांना काय कळणार विक्रम अशा बदल विकास विक्रमाच्या
वादळात प्रचारपुर्वक शांतता दिसुन येते नाराजीचा सुरूंग मतदारांच्या अंत करणात स्फोट
घडवुन आणत आहे.रोजगार नाहीकंस भरणार पोंट स्थानिक पत्रकार असो की लोकप्रतिनिधीत्व करणारा
कार्यकर्ता समाजसेवक त्यांच्या उरावर बाहेरचा आणून बसवायाचा तुमची आम्हाला गरज नाही
विरोधक निर्भिडता कायमचे नष्ट करण्याचा डावतर नाही ना असं वाटृ लागलय.
Post a comment